आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यसंमेलन:नाशकात मराठी साहित्यसंमेलन 19 ते 21 नोव्हेंबरला, समित्यांना काम करण्याच्या भुजबळांकडून सूचना

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ७ महिन्यांपासून लांबलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर १९ ते २१ नोव्हेंबरला नाशिकमध्ये होणार आहे. त्यानुसार तयारीला लागण्याच्या सूचना संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समित्यांना दिल्या. तयारी सुरू झाली असली तरी संमेलनावर कोरोनाची टांगती तलवार मात्र कायम आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आणि लोकहितवादी मंडळ निमंत्रक असलेले हे संमेलन अखेर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात यापूर्वीच ठरलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर होणार आहे. येवला, निफाड, सिन्नर तालुक्यांत व शेजारील अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. मात्र पुढील दीड महिन्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरच संमेलन होणार की नाही हे अवलंबून असेल.

मार्चमध्ये होणार होते : यंदा २६ ते २८ मार्चदरम्यान मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडणार होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट व त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संमेलन रहित करण्यात आले होते.

साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील तसेच शेजारच्या नगर जिल्ह्यातील काही गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली असल्याने पुन्हा त्या-त्या वेळी परिस्थितीनुसार निर्णय घेऊ. मात्र ऐनवेळी धावपळ नको म्हणून संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या समित्यांना कामे सुरू करण्याच्या सूचना आहेत.

बातम्या आणखी आहेत...