आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:साहित्य संमेलन 26 ते 28 मार्चला, अध्यक्षपदासाठी भारत सासणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • समाराेपाला पुरणपाेळी, मांडेची मेजवानी

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २६ ते २८ दरम्यान हाेणार आहे.

संमेलन तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच १९ ते २१ मार्चला घ्यावे अशा महामंडळाच्या सूचना हाेत्या. मात्र, आयाेजक लाेकहितवादी मंडळाने शेवटचाच आठवडा लावून धरल्याने मग महामंडळ अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी याच तारखांना मान्यता दिली. रविवारी २४ तारखेच्या बैठकीत यावर पुन्हा चर्चा केली जाणार असून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. संमेलन नाशिकच्या गाेखले एज्युकेशन साेसायटीच्या प्रांगणात हाेणार आहे. ते ३१ मार्चच्या आत म्हणजेच चालू आर्थिक वर्षात व्हावे असा महामंडळाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच मार्चमध्ये संमेलन हाेत आहे. शनिवारच्या बैठकीस साहित्य महामंडळाचे अध्यक्ष काैतिकराव ठाले पाटील, दादा गाेरे, उषा तांबे, रामचंद्र काळुंखे, कपूर वासनिक, मिलिंद जाेशी, विलास मानेकर, लाेकहितवादी मंडळाचे विश्वस्त माजी आमदार हेमंत टकले, अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.

समाराेपाला पुरणपाेळी, मांडेची मेजवानी
संमेलनाचा समाराेप होळीला म्हणजे २८ मार्च राेजी हाेणार आहे. त्यामुळे पुरणपाेळी त्याचबराेबर उत्तर महाराष्ट्रातील खास स्पेशालिटी असलेले मांडे याची मेजवानी देण्याचा प्रयत्न आयाेजकांकडून हाेणार आहे. याचबराेबर जळगावची भरताची वांगी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. म्हणून भरीत-भाकरीचा बेत ठेवण्याचा विचार आहे.