आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू अवतार दिन अष्ट शताब्दी महोत्सवानिमित्त संपूर्ण भारतभरातील महानुभावपंथीय संत-महंत, भिक्षुक, वासनिक तसेच तपस्विनी माता, पुजारी व नामधारक बंधू-भगिनींच्या एकत्र पंथीय विचारविनिमय करण्याच्या दृष्टीने तसेच श्रीचक्रधरप्रभू यांच्या विचारांना सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय महानुभावपंथीय संतसाहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. संत संमेलन २९ ते ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नाशिक येथे होणार आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठीची बैठक माजी आमदार व आगामी संमेलनाचे मुख्य आयोजक बाळासाहेब सानप यांच्या नांदूरनाका येथील फार्म हाउसवर पार पडली. या बैठकीस जिल्हा निवासी संत, महंत तसेच जिल्ह्यातील वासनिक व पुजारी उपस्थित होते. त्यामध्ये सुकेणा निवासी पूजनीय आचार्य महंत श्री सुकेणेकर बाबा, महंत डोळसकर बाबा, महंत चिरडे बाबा, महंत कृष्णराज मराठे बाबा, आमदार बाळासाहेब सानप आदींनी मार्गदर्शन केले. जिल्हा निवासी महंत वाल्हेराज बाबा, महंत सायराज बाबा, महंत परसराम बाबा, महंत गोपीराज शास्त्री, माजी नगरसेवक दिनकर पाटील, प्रकाश नन्नावरे, सुरेश डोळसे, राजेंद्र जायभावे, लक्ष्मण जायभावे, भास्करराव सोनवणे, भास्करराव गावित, वैद्य, आप्पा भोजने, नंदूभाऊ हांडे, किरण मते, दत्ताभाऊ गवळी आदींनी नियोजनाबाबत चर्चा केली. कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी (दि. १९) दिनकर अण्णा पाटील यांच्या निवासस्थानी, इंग्लिश मीडियम स्कूल, गंगापूर येथे दुपारी चारला बैठक आयोजित केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.