आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे:पालकमंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रकारची मदत करण्यात येत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्याने त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीथॉन प्रदर्शन ठक्कर डोम येथे आयोजीत करण्यात आले आहे.गुरुवारी या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार देविदास पिंगळे, विजय नाना पाटील, पुष्कर तराई यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी विविध कृषी तंत्रज्ञान विकसित होत आहे, या तंत्रज्ञानाचा प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्याचा उपयोग होत आहे. शेती क्षेत्रात संशोधन होत असून ड्रोनद्वारे फवारणी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ व इतर अपत्ती प्रसंगी उपग्रहाच्या माध्यमातून मदत देण्याची नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असून नुकसान भरपाई या माध्यमातून देण्यात येणार आहे, असेही भुसे म्हणाले. यात सहभागी झालेल्या कंपन्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन प्रयोग यशस्वी करून दाखवावे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, या कृषी कंपन्यांनी गाव दत्तक घेऊन आपले प्रयोग यशस्वी करून दाखवले तर तो एक पथदर्शक आणि मार्गदर्शक प्रकल्प ठरेल असेही ते म्हणाले. सध्या टोमॅटो व कांद्यालाही भाव नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहेत, प्रधानमंत्री पिक विमा योजनासाठी बीड मॉडेल राबविण्यात येणार असल्याचेही भुसे यांनी सांगितले. आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, रश्मी हिरे हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...