आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे रामायणात मिळतात:रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रामायण कथेला नाशिक येथे प्रारंभ

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर येथील श्रमिकनगरच्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या पटांगणावर भव्य डोम मंडपात रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक नागपूरकर यांच्या श्री रामकथा तथा श्री रामायण कथेला धार्मिक प्रारंभ झाला. प्रसंगी श्री रामराव महाराज ढोक यांनी श्री रामायण ग्रंथ महात्म्य व शिवपार्वती विवाह या विषयावर कथा प्रवचन केले.

याप्रसंगी श्री ढोक महाराज म्हणाले की, रामायणात जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, येथे बंधू प्रेमाचा आदर्श पाहायला मिळतो, तुलसी रामायण आणि राम चरित्र मानस हे धर्मग्रंथ भारतीय संस्कृतीचे प्रतीके आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच राम कथेमध्ये सहभागी होणे म्हणजे जणू काही मानसरोवरांमध्ये स्नानाचा आनंद घेण्यासारखे आहे, असेही महाराज यांनी सांगितले.

ग्रंथ पूजन-आरती

या कार्यक्रमाच्या प्रारंभी रामराव महाराज ढोक आणि मुख्य आयोजक दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते श्रीराम सीतामाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच श्री हनुमान प्रतिमेचे पूजन, ग्रंथ पूजन आणि राम कथा संकल्प करण्यात आला. अमोल दिनकर पाटील यांच्या हस्ते ग्रंथ पूजन आणि आरती करण्यात आली.

यांची साथसंगत

याप्रसंगी मुख्य गायक काशिनाथ महाराज पाटील ( जळगाव ), यांनी संवादिनी साथ दिली. तर गायक निळोबा महाराज सूर्यवंशी (कोपरगाव ), सहगायक रोहिदास महाराज जगदाळे (कोपरगाव ) तबलावादक अश्विनी कुमार भकने ( छिंदवाडा, संसर मध्य प्रदेश ) यांनी साथसंगत केली.

कथांचे प्रवचन रामराव महाराज ढोक करणार

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री.गणेश वंदना, करण्यात आली यावेळी व सामुदायिकपणे भाविकांच्या हस्ते सामुदायिक आरती करण्यात आली. दरम्यान 11 सप्टेंबरला श्रीराम जन्म, 12 सप्टेंबरला सितास्वंयवर, 13 ला केवट कथा, 14 ला सिताहरण, 15 ला लंका दहन, 16 सप्टेंबरला रावण वध व श्रीराम राज्याभिषेक या कथांचे प्रवचन श्री रामराव महाराज ढोक करणार आहेत.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी आयोजक तथा महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर अण्णा पाटील, माजी नगरसेविका लताबाई पाटील, सामाजिक कार्यकर्ते विष्णू पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे व भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष अमोल पाटील उपस्थित होते. याप्रसंगी सातपूर, श्रमिक नगर, सातपूर कॉलनी, गंगापूर गाव आदिसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...