आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद साधणार:‘परीक्षा पे चर्चा’साठी 23 डिसेंबरपर्यंत सर्व शाळांना नोंदणीचे आवाहन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीमध्ये नववी ते बारावीचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. त्या अनुषंगाने २०५० विजेत्यांना एनसीइआरटीतर्फे प्रमाणपत्र व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘परीक्षा योद्धा’ हे पुस्तक देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा-६’ या कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळांमधील नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी २३ डिसेंबरपर्यंत http://innovateindia.mygov.in/ppc-२०२३/ या लिंकवर नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, मनपा क्षेत्र १ व २ मधून प्रत्येकी किमान ८०० विद्यार्थी, २०० शिक्षक आणि ५० पालकांनी सहभागी होणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...