आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेचन:ऑल सोल डे; पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा

देवळाली कॅम्पएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ख्रिस्ती बांधवांतर्फे देवळालीच्या सेंट पॅट्रिक्स दफनभूमीत बुधवारी सायंकाळी ऑल सोल डे (आत्मांचा पवित्र दिवस) फुले व मेणबत्ती पेटवून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने नातेवाइकांनी पूर्वजांना स्वर्ग प्राप्त व्हावा याकरिता ‘मिसा’ (प्रार्थना) अर्पण केली.

जगभरातील ख्रिश्चन बांधव २ नोव्हेंबर या दिवशी आपल्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्त व्हावा या उद्देशाने हा विधी साजरा करतात, येथील सेंट पॅट्रिक्स दफनभूमी येथे देवळालीतील ख्रिश्चन बांधवांसह नाशिक, मुंबई, पुणे, गोवा आदी राज्याच्या विविध भागातून आलेल्या बांधवांनी पूर्वजांच्या स्मरणार्थ मिसा अर्पण केली. फादर प्रेयर फादर पायास राॅड्रिक्स, विल्सन परेरा यांनी विवेचन केले. यावेळी केना अँथनी, विल्यम जॉन, सनी पिल्ले, पॅट्रिक स्वामी, लोयेड स्वामी, लुईस पिंटो यांनी येथे येणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा दिली. मृत आत्म्याला सन्मान देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, कबर फुलांनी आणि मेणबत्त्यांनी सजवली जाऊन प्रार्थना केली जात असल्याचे रेजिना नायडू यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...