आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:घोटाळा झाल्याचा आरोप; म्हाडा घोटाळ्याचा बार फुसका ठरण्याची शक्यता

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चार हजार चौरस मीटर पुढील भूखंडांवर आर्थिक दुर्बल घटकांसाठी २० टक्के राखीव सदनिका वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करत सुरू केलेल्या चौकशीचा बार फुसका ठरण्याची शक्यता असून या प्रकरणात फारसे काही हाती लागत नसल्याचे बघून राज्याच्या गृहनिर्माण विभागाने बुधवारी (१५) महापालिकेला पत्र पाठवून तात्पुरते मंजूर अभिन्यांसांची (टेंटेटिव्ह लेआउट) माहिती मागवली आहे.

म्हाडासाठी राखीव सदनिका वाटपात साडेसातशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. याप्रकरणी विधानपरिषदेमध्ये सर्वपक्षीय आमदारांनी चौकशीची मागणी केल्यानंतर सभापती रामराजे निंबाळकर यांनी तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश देत चौकशी सुरू केली. त्यानुसार महापालिका आणि म्हाडामध्ये बैठक होऊन योजनेशी संबंधित ६५ प्रकल्पांसह ५२ ले-आउटबाबतची माहिती मागवली.

या सर्वांना नोटिसा देऊन त्यांना या प्रकल्पासंदर्भातील सर्व माहिती घेतल्यानंतर त्यानुसार अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते. मात्र या प्रकरणांमध्ये फारशी अनियमितता झाल्याचे समोर येत नसल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर गृहनिर्माण विभागाने आपला रोख बदलल्याची चर्चा आहे. हे काम अंतिम टप्प्यात आणले असतानाच गृहनिर्माण सचिव अनिल डिग्गीकर यांनी आत तात्पुरते मंजूर अभिन्यांसांची (टेंटेटिव्ह लेआउट) देखील माहिती तातडीने सादर करण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे महापालिकेला धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...