आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक:एमआयडीसीचे भूखंड वाटप स्थानिक पातळीवर; उद्योग उभारणी प्रक्रिया सुलभ

नाशिक / संजय भड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आैद्याेगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आैद्याेगिक क्षेत्रामधील ५ हजार चाैरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडांचे तसेच एमएसएमइ उद्योजकांना २५०० चाैरस मीटर पर्यंतच्या भूखंडांचे वाटप करण्याचे अधिकार आता एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील भूखंड वाटप समितीला देण्यात आले आहे. यामुळे भूखंड वाटपाच्या बहुतांश प्रकरणांत स्थानिक पातळीवरच निर्णय शक्य हाेणार असून उद्योजकांना नवा उद्याेग उभारणे किंवा उद्याेग विस्तार करणे साेपे हाेणार आहे.

एमआयडीसीचे भूखंड, गाळा, शेड यांचे वाटप, हस्तांतरण आणि इतर प्राप्त प्रस्तावांवर निर्णय घेण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रादेशिक अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरील भूखंड वाटप समित्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारांमध्ये बदल करणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर आता एमआयडीसीने त्यात बदल केले आहेत. यानुसार आता अनेक अधिकार प्रादेशिक अधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. नवीन बदल उद्योजकांना लाभदायी या नव्या बदलांमुळे स्थानिक स्तरावरील परिस्थिती प्रादेशिक अधिकाऱ्यांना माहिती असते. त्यामुळे भूखंडाचे वितरण करणे स्थानिक स्तरावरच शक्य आहे, ज्याचा मोठा फायदा उद्योजकांना होणार आहे. यापूर्वी नेमके कोणाकडे प्रकरण आहे? हा प्रश्न उद्योजकांना पडायचा, नाशिक ते मुंबई अशा चकरा वारंवार माराव्या लागत हाेत्या. या नव्या विकेंद्रीकरणामुळे त्या आता थांबू शकतील.

या प्रकरणांत प्रादेशिक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अधिकार {सर्व व्यापारी भुखंड, गाळे हे निविदा पध्दतीनेच वितरीत हाेतील. {१ हजार चाैरस मीटर क्षेत्रफळापर्यंतचे बिल्टअप शेड तसेच बिल्डअप गाळे यांचे वाटप. {वृक्षाराेपण, बागबगिचा, सुशाेभिरण यांसाठी जागा वाटप करणे (५ हजार चाैरस मिटरपर्यंत भूखंडांचे वाटप). {५ हजार चाैरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडांचे हस्तांतरण करणे. {५०० चाैरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या व्यापारी भूखंडांचे तसेच ५०० चाैरस मीटर बिल्टअप एरिया असलेल्या गाळ्यांचे हस्तांतरण करणे. {१ हजार चाैरस मीटर क्षेत्रफळापर्यंत बिल्टअप शेड, तसेच १ हजार चाैरस मीटर बिल्टअप क्षेत्राचे गाळे हस्तांतरण करणे.

बातम्या आणखी आहेत...