आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूसाठी नाशिककरांना विमानसेवा:बंगळुरू, गोव्यासाठीही सप्टेंबरपासून उड्डाण

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली आणि हैदराबाद या नव्या विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता गोवा आणि बंगळुरूसाठी नाशिककरांना विमानसेवा मिळणार आहे. २५ सप्टेंबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत ही नवी सेवा स्पाइस जेट या कंपनीकडून मिळणार आहे. ९० आसनी विमानाद्वारे आठवडाभर ही सेवा उपलब्ध असेल.

४ ऑगस्टपासून दिल्लीसाठी थेट सेवा सुरू होत आहे. याचदरम्यान बंगळुरू आणि गोवा यांना जोडणारी सेवादेखील स्पाइस जेट देणार आहे. सोमवार ते शनिवार आठवड्याचे सर्व दिवस ही सेवा असेल. यासंदर्भात आयमाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये नाशिककरांची पसंती गाेव्याला हाेती असे आयमाच्या एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी सांगितले. वेळापत्रक असे... बंगळुरूहून उड्डाण - दुपारी१२.३५ नाशिकला येणार - दुपारी २.३५ गाेव्यासाठी उड्डाण - दुपारी २.५५ गोव्याला पोहोचणार - दु.४.००

गोव्याहून उड्डाण - सायं. ५.३० नाशिकला येणार - सायं.६.३५ नाशिकहून उड्डाण - सायं. ६.३५ बंगळुरूला पोहोचणार - रात्री ९

बातम्या आणखी आहेत...