आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी इमारत:‘संदर्भ’त पेडियाट्रिक, न्युरो व प्लॅस्टिक सर्जरीही; 5 महिन्यांत होणार नवी इमारत

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर महाराष्ट्राच्या हृदय, मुत्रपिंड व कर्करोगासाठी असलेले विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाची व्याप्ती आता वाढणार असून लह‍ान मुलांसाठी पेडियाट्रिक विभागासह न्युरो व प्लॅस्टिक सर्जरीसाठी रुग्णालयालालगत असलेल्या मोकळ्या जागेवर दोन मजली इमारत उभारली जात आहे. या इमारतीचे काम ४० टक्के झाले असून पुढील पाच महिन्यात काम पूर्ण होणार असून या नवीन इमारतीमुळे १०५ खाट वाढणार आहे.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात न्युरो, पेडियाट्रिक व प्लॅस्टिक सर्जरीसाठी नवीन दोनमजली इमारतीसाठी मागील पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधींसह रुग्णालय प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शासनाकडून १६ कोटी ८ लाख ५१ हजार रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून २००८ मध्ये नाशकात उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा पुरविण्याच्या हेतूने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुरू केले आहे.

रुग्णालयांतील अनेक यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याचे चित्र आहे. या रुग्णालयात मुत्रपिंड, कॅन्सर, हृदयाशी संबंधित विकारांवरच उपचार कले जातात. यात सर्वाधिक हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया होतात. खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणारी बायपास शस्त्रक्रियाही संदर्भ रुग्णालयात केली जाते.

आहे त्या इमारतीवर दोन मजले चढविण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर या इमारतीवर आणखी दोन मजले बांधता येणार नसल्याचा अहवाल दिला.त्यानंतर रुग्णालयाच्या आवारात मोकळ्या जागेवर न्युरो इमारतीचे काम सुरू झाले आहे. ते पुढील पाच महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...