आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्काची गाडी पळवली:पर्यायी गोदावरी ट्रेन आठवड्यातून 3 दिवस मनमाडऐवजी धुळ्याहून, धुळे-दादर रेल्वेच्या नावाने धुळफेक

प्रतिनिधी | मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेने १ मेपासून धुळे-दादर ही नवी रेल्वे आठवड्यातून तीन दिवस सुरू केल्याची घोषणा केली खरी. परंतु ही गाडी नवी नसून सध्याची पर्यायी गोदावरी म्हणजे मनमाड- दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसच मनमाडहून धुळ्याला पळवून नेल्याची खळबळजनक माहिती आली आहे. त्यामुळे प्रवाशांत तीव्र संताप व्यक्त केला जात असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

धुळे-दादर ही गाडी नवीन असल्याचे भासवून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते तिचे उद्घाटन शनिवारी, दि.२९ रोजी धुळे येथे झाले. आठवड्यातून तीन दिवस धुळ्याहून तर मध्ये गुरुवारची सुट्टी घेऊन तीन दिवस मनमाडहून ही गाडी धावणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

कोरोना प्रादुर्भावाचे कारण देवून दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची हक्काची हमखास जागा मिळणारी व वेळेवर सुटणारी मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस बंद केली. ती आजपर्यंत पूर्ववत सुरू झालेली नाही. त्याऐवजी गोदावरीच्या वेळेत रेल्वे प्रशासनाने मनमाड- छत्रपती शिवाजी टर्मिनस ही स्पेशल ट्रेन मर्यादित कालावधीसाठी सुरू केली. सध्या ती गुरूवार वगळता मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर अशी धावत आहे.धुळे-दादर (०१०६६) ही गाडी सोमवार, मंगळवार व शनिवारी धुळ्यावरून सकाळी ६.३० ला सुटेल. मनमाडला सकाळी ८.४० ला, नाशिकला ०९:३८ तर दादरला दुपारी १.१६ ला पोहचेल. दादर-धुळे (०१०६५) ही गाडी रविवार,सोमवार व शुक्रवारी दादर येथून सायं.४.१५ ला निघेल.