आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरा तपस्विनी पुरस्कार:दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदला ; घरकुल परिवाराच्या विद्याताई फडकेंचे आवाहन

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंध, कर्णबधिर, अपंग व्यक्ती शिकून किमान नोकरी व्यवसाय करू शकते. परंतु दिव्यांग मुला-मुलींना प्रत्येक गोष्ट अतिशय मेहनतीने शिकवावी लागते. अशा मुलींना काय येत नाही, यापेक्षा काय येते हे पाहणे महत्त्वाचे आहे. या विद्यार्थ्यांत अनेक चांगले गुण असतात, त्यामुळे समाजाने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, अशी अपेक्षा घरकुल परिवार संस्थेच्या विद्याताई फडके यांनी व्यक्त केली.

मधुरा ट्रस्ट व महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना मधुरा तपस्विनी पुरस्काराने सावानाच्या मु. श. औरंगाबादकर सभागृहात सन्मानित करण्यात आले. घरकुल परिवाराच्या विद्या फडके, महिला हक्क संरक्षण समितीच्या हेमाताई पटवर्धन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

मधुरा वूमेन एम्पॉवरमेंट अँड वेल्फेअर ट्रस्टच्या जनरल सेक्रेटरी संपदा हिरे अध्यक्षस्थानी होत्या. मुलींवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून त्यांच्या पुनर्वसनासाठी धडपडणाऱ्या शोभा पवार, वेश्या व्यवसायात फसवून आणलेल्या महिलांना आरोग्य, शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या आसावरी देशपांडे व विधिज्ञ कविता पगार यांना ‘मधुरा तपस्विनी पुरस्कार २०२२’ने सन्मानित करण्यात आले. चिमुरड्यांनी सादर केलेले गोंधळी नृत्य लक्षवेधी ठरले. मधुरा ट्रस्टच्या अध्यक्षा संपदा हिरे यांनी मधुरा ट्रस्ट महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ.पूनम सोनवणे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सरला सानप यांनी केला आणि आभार पल्लवी फडके यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...