आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमलकी एकादशीनिमित्त काळारामाला 32 हाती श्वेतवस्त्र:नाशिकमध्ये या वस्त्रावर रंग उधळल्यानंतर सुरू हाेते रंगपंचमी

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये आमलकी एकादशीनिमित्त आज काळारामाला 32 हाती श्वेतवस्त्र फेटा बांधला गेला. सीतादेवींना साडीचोळी नेसवून विधीवत महापूजा करण्यात आली. यावेळी 'जय श्रीराम' च्या जयजयकारात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या श्वेत वस्त्रांवर रंग उधळून नाशिककरांची रंगपंचमी सुरू होते.

देशभरात उन्हाची दाहकता वाढलेली असताना रामरायापर्यंत उन्हाच्या झळा पोहचू नयेत यासाठी आमलकी एकादशी दिवशी काळराम आणि सीतेला पांढऱ्या रंगाचे वस्त्र नेसवले जाते.एरवी वर्षातील अकरा महिने रामाला पितांबर नेसवले जाते. पण फाल्गुन महिन्याच्या आमलकी एकादशीदिवशी ही वस्त्र बदलली जातात.

27 पिढ्यांचा वारसा

आज(शुक्रवार) मंत्राेच्चरात भगवान श्रीरामाला ही वस्त्र परिधान करण्यात आली. या सर्व कार्याला तब्बल दोन तास लागली. विशेष म्हणजे ही 27 पिढ्यांचा वारसा असणारी परंपरा पुजारी घराण्याकडून अनेक शतके अखंड पाळली जाते. काळाराम मंदिराचे विश्वस्त धनंजय पुजारी, श्रीमहंत सुधीरदास महाराज, निनाद पुजारी दिपक कुलकर्णी यांनी हा विधी पार पडला.

अशी हाेते रंगपंचमीला सुरुवात

हाेळीच्या पाचव्या दिवशी रंगपचंमीला केशर व पळसाच्या फुलांचा रंग उकळून त्याचा रंग केला जातो. येत्या वासंतिक नवरात्राच्या उत्सवाचे मानकरी समीर बुवा पुजारी यांच्या हस्ते श्रीं ना श्रीखंडाचा नैवेद्य श्वेत वस्त्रावर हा रंग व गुलाल उधळून नाशिककरांची रंगपंचमी रहाड उत्सव सुरु होतो.

32 हाती श्वेतवस्त्र

आमलकी एकादशीनिमित्त भगवान श्रीरामांना 32 हात शुभवस्त्र व फेटा परिधान करण्यात आला. सोळा मीटर कपडयाचा असणारा हा 32 हात कपडा ही पूर्वीपासून बाेलीभाषेत प्रचलित आहे.उन्हापासून भगंवाताचे रक्षण व्हावे या उद्देशाने फाल्गून मासमध्ये रामरायाला शुभव्रस्त्र नेसवले जातात. देशात फक्त शहरातील काळाराम मंदिरात अशा प्रकारे पुजा केली जाते असे महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...