आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाहतूक समस्या, अतिक्रमण, रस्त्यांच्या खोदकामामुळे उद्भवणाऱ्या समस्या तसेच अवैध धंद्याला आलेला उत असे अनेक गंभीर प्रश्न उद्याेजकांनी मांडल्याने निमाने बाेलावलेली विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसाेबतची बैठक चांगलीच गाजली. याच बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले गेले. दुहेरी फायरसेसचा प्रश्न मार्गी लागला असून १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल असे महापालिका आयुक्तांनी सांगितले. अंबड पाेलिस ठाण्याचे विभाजन लवकरच हाेऊन नवे पाेलिस ठाणे कार्यरत हाेणार असल्याची माहीती पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार महापालिका, पोलिस, महसूल, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी झाली. व्यासपीठावर महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, सचिव राजेंद्र अहिरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कामगार उपायुक्त विकास माळी, जिल्हा उदयोग केंद्र सहसंचालक शैलेंद्र राजपूत अादी होते. सीईपीटी करू, नीरीचा अहवाल आला असेल तर या मुद्यावर पुढे जाऊ अशी घोषणा महापालिका आयुक्त पुलकुंडवार यांनी केली .सातपुरला शहरात गॅस पाइपलाइन जाळे होणार आहे. चुकीची कामे करू नका असे मोबाइल कंपन्यांना सांगितले आहे.
तुमचे काम करतांना दुसऱ्या युटिलिटीला तडे नको असे त्यांना बजावले आहे. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा. एलबीटीचे परतावे लवकर होतील, असेही ते म्हणाले. जाचक मालमत्ता कराबाबत बोलताना इंडस्ट्रियल स्लॅब करू असे आयुक्तांनी सांगितले. सांडपाण्याचा प्रकल्प अमृत-२ मधून घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले.
कामगारांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास सांगा : सर्वांनी नियम पाळल्यास वाहतूक समस्येला आळा घालणे शक्य होईल, प्रत्येक उद्याेगाने त्यांच्या कामगारांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी प्रवृत्त केल्यास बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न ५० टक्के सुटेल असे अावाहन पाेलीस अायुक्त अंकुश शिंदे यांनी केले. वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी वाहतूकदारांचे प्रश्न मांडून सध्या बंद असलेल्या सर्व जकात नाक्यांवर ट्रक टर्मिनस उभारल्यास वाहतुकीला आळा बसू शकेल असे ते म्हणाले.
अतिक्रमणे हटविण्यासाठी संयुक्त माेहीम राबवणार
आयटीआय सिग्नल, एक्सलो पॉइंटसह तीन ठिकाणी सातत्याने वाहतूक ठप्प होते. कुठलेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही व ते तातडीने काढल्या जाईल अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी पहाता महापालिका आणि संबंधित यंत्रणांबराबर संयुक्त मोहीम हाती घेतली जाईल तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका, पाेलिस आणि एमआयडीसी यांची संयुक्तपणे माेहीम राबविली जाइल असे महापालिका आयुक्त व पाेलिस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.