आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पोलिस चाैकीसाठी अंबड ग्रामस्थांचा पायी माेर्चा

सिडको2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड भागात सततच्या घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता या ठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करावी व सक्षम पोलिस आधिकारी नेमावा या मागणीसाठी अंबड ग्रामस्थांचा मुंबईत मंत्रालयावर पायी माेर्चा नेण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. ६) सकाळी ९ वाजता अंबड येथील एक्स्लाे पाॅइंट येथून हा माेर्चा काढण्यात येणार आहे.

अंबड ग्रामस्थांकडून या मागणीसाठी वेळाेवेळी आंदोलन करण्यात आले. त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने मंत्रालयावर अर्धनग्न पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. सिडको परिसरातील दत्तनगर, कारगिलनगर, मारुती संकुल, अंबडगाव औद्योगिक वसाहत येथे वाढती गुन्हेगारी, अवैद्य व्यवसाय यांच्या जाचाला कंटाळून पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दरबारी जाऊन गाऱ्हाणे मांडणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोदे, रामदास दातीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बातम्या आणखी आहेत...