आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडगिरीचे चित्र:अंबडला गुंडांची हुल्लडबाजी; पाेलिस झाेपेतच

सिडको22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटातील दृश्याप्रमाणे गुंडगिरीचे चित्र अंबड, दत्तनगर भागात पाहावयास मिळत आहे, ५० ते ६० गुंडांचे टाेळके सर्रासपणे नागरिकांच्या घरांवर दगडफेक करीत आरडाआेरड, घरांच्या दरवाजांवर लाथा मारीत दहशत माजवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात, रहिवाशांकडून अंबड पाेलिस ठाण्यात तक्रारी देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संतप्त महिलांनी आता शनिवार (दि.१७)पर्यंत गुंडांना अटक न केल्यास पाेलिस ठाण्यावरच माेर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

विराेध केला तर घरात घुसून मारहाण
संशयित अंतेश सिंह हा गुंड टवाळखोरांना परिसरात आणून नागरिकांना वेठीस धरताे. गुंडांना एकत्रित घेऊन हातात दगड, काठ्या घ्यायच्या आणि घरांवर हल्ले करायचा, असा प्रकार घडत आहे. दोन दिवसांपूर्वीच याच अंतेश सिंहच्या टाेळीतील एकाचा वाढदिवस साजरा झाला. काही नागरिकांनी विराेध केल्याने टाेकळ्याने वाद घालत बारा रहिवाशांच्या घरांवर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. काेणीही विराेध केला तर त्याला घरात घुसून मारहाण केली जात आहे.

पाेलिसांची अकार्यक्षमता घटनांतून उघड
याच गुंडांनी वर्षभरापूर्वी एका गर्भवतीला मारहाण केली हाेती. तेव्हाही अंबड पाेलिसांनी दुर्लक्षच केल्याचे नागरिकांनी सांगितले. अंबड हद्दीत युवकांवर प्राणघातक हल्ले, महिला, मुलींची छेड, महिन्याभरात बलात्काराच्या पाच ते सहा घटना घडल्या. मात्र पाेलिस यावर करू, बघू अशी भूमिका घेत आळमटळम करत असल्याचा आराेप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...