आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाेषण:अंबडच्या प्रकल्पग्रस्तांचे आंदाेलन‎

सिडको21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी‎ महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात ‎येणाऱ्या दंडात्मक नोटिसांच्या विरोधात‎ अंबड व सातपूरच्या भूमिहिनांना‎ शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणाला अंबड‎ येथे प्रारंभ झाला आहे.‎ अंबड-सातपूर औद्योगिक‎ वसाहतीसाठी भूसंपादन केलेल्या‎ शेतकऱ्यांनी ८ मार्चपासून आंदोलनाचा‎ इशारा दिला होता. शेतकऱ्यांना दिलेल्या‎ आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे‎‎ आजपासून अंबड सातपूर येथील‎ औद्योगिक वसाहतींना जमिनी दिलेले‎ शेतकऱ्यांनी अंबड घरपट्टी कार्यालयासमोर‎ साखळी उपोषण सुरू केलेले आहे.‎

आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर‎ केव्हाही आयुक्त कार्यालयासमोर‎ सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा‎ शेतकरी समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर‎ ‎यांनी दिला आहे. समितीचे महेश दातीर,‎ सचिन दातीर, रामदास दातीर, शांताराम‎ दातीर, शांताराम फडोळ, सतीश दातीर,‎ सोमनाथ दातीर, बाळासाहेब दातीर, शरद‎ कर्डिले, मनोज दातीर, गणेश मोरे, भिका‎ दातीर, राकेश दोंदे, दीपक दातीर आदी‎ माेठ्या संख्येने आंदाेलनात सहभागी झाले‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...