आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समित्यांत रंगणार निवडणुकीचा आखाडा:लासलगाव, पिंपळगाव कृउबा निवडणुकीबाबत संदिग्धता कायम

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून त्यात नाशिक जिल्ह्यात १२ समित्यांची निवडणूक होणार आहे. लासलगाव आणि पिंपळगावचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत मात्र संदिग्धता आहे. जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, सिन्नर, सुरगाणा, चांदवड, नाशिक, नांदगाव आणि मनमाड येथे प्रशासक तर घोटी व येवला येथे प्रशासकीय मंडळ असल्याने तेथे २७ सप्टेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ दरम्यान निवडणूक प्रक्रिया असेल. २९ जानेवारीला मतदान हाेईल.

जिल्ह्यात १७ बाजार समित्या असून उमराणे, देवळा, नामपूर, सटाणा, दिंडोरी येथे संचालक मंडळ आहे. मात्र, जेथे प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळ आहे, अथवा त्याचीही मुदत संपली किंवा ३१ डिसेंबर २०२२ ला संपेल तेथे ७ सप्टेंबरपासून मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...