आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिलेक्ट यूएसए इन्व्हेस्टमेंट समिट नाशिकच्या उद्याेजकांसाठी अत्यंत महत्वाची असून येथे 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय मार्केटमधील 1400 पेक्षा अधिक गुणवणूकदारांच्या तुम्ही थेट संपर्कात याल तसेच विविध देशांतील उद्योजकांना थेट भेटण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे मुंबई येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासातील वरिष्ठ वाणिज्य विशेषज्ञ शामली मेनन यांनी केले.
इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या नाशिक चॅप्टर तसेच आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या पुढाकाराने आयमाच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रात 2023 सिलेक्ट युएसए इन्व्हेस्टमेंट समिटची माहिती देतांना शामली मेनन बोलत होत्या. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ व प्रसिद्ध उद्योजिका प्रिया पांचाळ होत्या.
थेट परकीय गुंतवणुकीत अमेरिकेचा जगात अव्वल क्रमांक लागतो. भारताची थेट परकीय गुंतवणूक 14.4 अब्ज डॉलर्स इतकी आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत फर्मास्युटिकल, कृषी, आयटीसह विविध क्षेत्रांत भारतीय उद्योजकांचा डंका आहे. 1 ते 4 मे दरम्यान आयोजित 2023 सिलेक्ट युएसए इन्व्हेस्टमेंट समिट ही उद्याेजकांसाठी याच मुळे महत्वाची अाहे. भारतातील उद्याेजकांसाठी अमेरिकेत गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी असून नाशकातील उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मेनन यांनी यावेळी केले. प्रास्ताविक आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी केले तर शामली मेनन यांचा परिचय प्रिया पांचाळ यांनी करून दिला.यावेळी सिद्धेश रायकर,अलोक कनानी, के.एन. नांदूरकर, प्रशांत ठाकरे,अनिकेत महाजन, प्रमोद शहाबादकर यांच्यासह आयमाचे विविध पदाधिकारी आणि उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.
-------
व्यवसाय, तंत्रज्ञान देवाण-घेवाणीसाठीही महत्वाचे (चाैकट)
नाशिकमधील ज्या उद्याेगांना अमेरिकेत कार्यालय सुरू करायचे आहे किंवा गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही समिट महत्वाची मानली जाते. यापूर्वी झालेल्या विविध देशांतील अशा समीक्षा फायदा नाशिकच्या उद्योगांच्या व्यवसाय वृद्धीसाठी महत्त्वाचा ठरला आहे. शिवाय हया उद्याेगांच्या तेथील गुंतवणूकीनंतर नाशिकमधील उद्याेगांनाही त्या त्या देशातुन व्यवसाय वृध्दीसह तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण सुलभ हाेते. यामुळे स्थानिक उद्याेगांच्या वाढीसाठी अशा समिट महत्वाच्या ठरत असल्याचे निखिल पांचाळ यांनी सांगितले.
------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.