आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा उत्साहात:नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात

सिडको3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा नागरी सत्कार करीत अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, माजी मंत्री शोभा बच्छाव, कल्पना चुंबळे, राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे, शिवाजी चुंबळे, शिवानी पांडे, कैलास चुंबळे, प्राचार्य प्रशांत पाटील उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सौन्दणे यांनी प्रास्ताविक केले. नाशिक म्युझिक ग्रुपतर्फे गायनाचा कार्यक्रम झाला. प्राचार्य प्रशांत पाटील यांनी ज्येष्ठांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम’ याविषयावर व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी सांगितले की, ५० वर्षावरील व्यक्तींसाठी कौशल्य विकास कार्यक्रम घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. विविध कारणाने रोजगार गमावलेल्या, व्यवसाय बंद झालेल्या किंवा नवीन काहीतरी करू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी विविध कौशल्य विकासाद्वारे नवीन रोजगार, व्यवसाय सुरू करणे शक्य आहे.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक टिप्स् देऊन कुटुंबात ज्येष्ठांचे स्थान याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन रामदास शिंपी यांनी केले तर आभार जयराम गवळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आत्माराम देसले, नंदकुमार दुसानिस, अलका गारसे, बगाड, सावळीराम तिदमे, विजय गोसावी, विजय सोनार, रमेश बागुल, सुखदेव भामरे आणि प्रमिला पांडे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...