आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऊर्ध्व वैतरणा धरणातून सांडव्याद्वारे मुकणे धरणात तीन टीएमसी पाणी वळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाले तर, नाशिक व नगरची तहान भागणार असून संबधित प्रस्ताव मान्यतेसाठी जलसंपदा विभागाने राज्य शासनाला सादर केल्याचे समजते.
नाशिक महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या २० लाखांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. शिवाय गंगापूर धरणातून नाशिक शहरासह, निफाड, येवला, वैजापूरमार्गे औरंगाबाद व पुढे मराठवाड्याकडे पाणी जाते. गंगापूर धरण हे जुने झाले असून वाढत्या गाळामुळे साठवणूक क्षमताही घटत चालली आहे. दुसरीकडे, नाशिक शहराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने माेठ्या प्रमाणात पाणी मागणी वाढत आहे. या परिस्थिती मुकणे धरणावर सर्व आशा केंद्रित झाली आहे.
अशातच, आता वैतरणा धरणातून ओव्हरफ्लो होऊन अरबी समुद्रात जाणारे पुराचे पाणी मुकणेत आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. ऊर्ध्व वैतरणाचे समुद्रात जवळपास तीन टीएमसी पाणी जात असल्याचा अंदाज असून हेच पाणी सांडव्याद्वारे मुकणेत वळविल्यास नाशिकसाठी किमान एक टीएमसी पाणी अतिरीक्त उपलब्ध होऊ शकते. सध्याचे दीड व अतिरिक्त मिळणारे एक अशाप्रकारे अडीच टीएमसी पाणी उपलब्ध झाल्यास सुमारे आठ लाख नाशिककरांना मुबलक पाणी मिळू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.