आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणघातक हल्ला‎:दिंडाेरीराेडवर एकावर हल्ला

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरीरोडवर दाेघांनी‎ बंदुकीने डोक्यात मारून‎ एकावर प्राणघातक हल्ला‎ केल्याची घटना उघडकीस‎ आली आहे. याप्रकरणी‎ म्हसरुळ पोलिसांनी रिकेश‎ गणेश सोलंकी (२४, रा.‎ बेलदारवाडी, दिंडोरी रोड)‎ व रोहित खंडू गांगुर्डे (२३,‎ रा. फुलेनगर) यांना अटक‎ केली आहे.‎ राजेश देविदास पवार‎ (२३, रा. प्रभातनगर,‎ म्हसरुळ) याने दिलेल्या‎ फिर्यादीनुसार, गुरुवारी‎ सायंकाळी सातच्या‎ सुमारास संशयित रिकेश व‎ रोहित यांनी कुरापत काढून‎ वाद घातला.

राजेश या‎ संशयितांची समजूत काढत‎ असल्याचा राग आल्याने‎ दोघांनी राजेश व त्याचा‎ भाऊ मनोज पवार यास‎ शिवीगाळ करीत दमदाटी‎ केली. तर संशयित रोहितने‎ बंदुकसारखे हत्यार काढून‎ राजेशच्या डोक्यात मारून‎ जीवे मारण्याचा प्रयत्न‎ केला.‎

बातम्या आणखी आहेत...