आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद‎:दुचाकी चाेरणाऱ्या अभियांत्रिकीच्या‎ विद्यार्थ्यासह त्याचे दाेन मित्र जेरबंद‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण‎ घेणाऱ्या विद्यार्थ्यासह त्याच्या दाेन अल्पवयीन मित्रांना‎ दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.‎ संशयित रहिवाशी इमारतीमधून दुचाकी चोरी करत‎ असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सरकारवाडा पोलिस‎ ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गंगापूरनाका येथे ही कारवाई‎ संशयितांकडून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या‎ आहे.‎

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भाविकनगर (श्रीरंग‎ चौक) येथील संतोष कोरडे यांची दुचाकी पार्किंगमधून चोरी‎ झाली होती. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा‎ दाखल करण्यात आला होता. पथकाने इमारतीच्या‎ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची‎ तपासणी केली असता एक संशयित‎ परिसरात आल्याचे निदर्शनास‎ आले. त्याच्या वर्णानावरून पथकाने‎ त्याचा माग काढला. संशयित हा‎ गंगापूरनाका येथे रहात असल्याची‎ माहिती मिळाली. पथकाने संशयित‎ राहत असलेल्या रूममध्ये चौकशी‎ केली असता आयुष राजेश राका‎ (२०, रा. पिंपळनेर, साक्री) असे‎ नाव त्याने सांगितले. सखोल‎ चौकशीत त्याने रूममेटच्या मदतीने‎ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.‎ दुचाकीबाबत विचारणा केली असता‎ संशयित ज्या ठिकाणी रहात होता‎ त्या इमारतीच्या पार्किंगमधून पाच‎ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.‎

सहायक निरीक्षक मच्छिंद्र कोल्हे,‎ मुकेश राजपूत, संतोष लोंढे, नितीन‎ थेटे, नीलेश वायकंडे, अजय‎ ससाणे, युवराज भोये, संदीप‎ साळवे, विष्णू खाडे, सागर चौधरी‎ यांच्या पथकाने ही कारवाई केली.‎ भाडेकरारावर रहात दुचाकी चोरी‎ संशयित राका हा एका‎ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण‎ घेत आहे. तो आणि त्याचे दोन‎ साथीदार एकाच खोलीत राहतात.‎

तिघांनी मिळून एका विशिष्ठ‎ कंपनीच्या दुचाकींना मागणी‎ असल्याने या दुचाकी चोरी‎ करण्याचा कट रचला होता. तिघांनी‎ रहिवासी इमारतीमधून ५ दुचाकी‎ चोरी केल्या. या दुचाकी राहत‎ असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये‎ उभ्या केल्या. काही दिवसांनी या‎ दुचाकी ते धुळे येथे विक्री करणार‎ होते. विशेष म्हणजे संशयिताचे‎ वडील धुळ्यात व्यापारी आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...