आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजक नंदकुमार आहेर खून प्रकरणी उद्योग संघटना संतप्त:बुधवारी सकाळी बोलावली महत्वाची बैठक, राज्य शासनाकडे करणार न्याय मागण्या

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये उद्योजकाचा खून झाला त्यामुळे सर्व औद्योगिक संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. उद्या बुधवारी (ता. आठ) सकाळी इक्वेशन सेंटर येथे, सर्व संघटना तसेच व्यापारी संघटनाची महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीत राज्य शासनाला थेट संदेश पाठविण्यात येणार आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये नंदकुमार आहेर यांची आहेर इंजिनिअरिंग ही कंपनी आहे. ते या कंपनीचे संचालक आहेत. आज सकाळी नंदकुमार आहेर कंपनीत जात असताना कंपनीच्या प्रवेशद्वारावरच दबा धरून बसलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यात आहेर यांचा मृत्यू झाला, हल्ल्यानंतर हल्लेखोर पळुन गेले.

नाशिकच्या उद्योजकांचे म्हणणे आहे की, नाशिक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारच्या घटना यापूर्वी घडलेल्या नाहीत. उद्योजकांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण असून पोलीस यंत्रणेचा कुठलाही वचक नाशिकमध्ये राहिलेला नाही अशी तीव्र भावना आहे. उद्योजकांच्या अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन लघु उद्योग भारती, उद्योग आघाडी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांसह विविध संघटना या बैठकीत सहभागी होणार असून उद्योग बंद करण्याच्या गोष्टी यात होऊ शकतात अशी सूत्रांकडून महत्त्वाची माहिती आहे.

शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या

भाजप उद्याेग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार म्हणाले, जर प्रशासनाला खुनाचे सत्र थांबवण्यात अपयश येत असेल तर नागरिकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी. कुणाच्या पालकत्वाखाली हे सुरू आहे, हे जनतेला समजले. दिवसाढवळ्या उद्याेगाच्या प्रवेशव्दारासमाेर अशा प्रकारे खून हाेणे हे पहिल्यांदाच घडत असून अतिशय घृणास्पद घटना आहे. भाजपा सरकारच्या काळात हे सर्व नाशिकमध्ये नव्हते आत्ताच कसे सुरू झाले? हा खरा प्रश्न आहे.
उद्योजकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

'आयमा'चे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे म्हणाले की, ह्या निर्दयी घटनेमुळे उद्योजकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. दिवसा ढवळ्या सकाळच्या सुमारात कंपनीच्या गेटवर हल्लेखाेरांकडून अशी हत्या केली जाते, यामुळे, पाेलीसांचा धाक उरला आहे की नाही? अशी संतप्त भावना उद्योजकांमध्ये आहे. उद्याेजकांनी एकत्रित यावर चर्चा करून निर्णय घेतला पाहीजे जेणेकरून अशा घटना भविष्यात टाळता येऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...