आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णसंधी:सेफ झाेनद्वारे जागतिक बाजारपेठेशी जोडण्याची व्यावसायिकांना संधी; सेफ झोनचे अधिकारी पी. राजीव यांचे आवाहन

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारजाह एक उदयोन्मुख व्यापार केंद्र असून, उत्कृष्ट जमीन, सागरी आणि हवाई संपर्काद्वारे अद्वितीय लॉजिस्टिक फायदे देते. नाशिकमधील व्यापारी समुदायाने सेफ झोनमध्ये आपला व्यवसाय सुरू करून यूएई सरकार देत असलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेफ झोनचे अधिकारी पी. राजीव यांनी केले.

भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात नुकत्याच स्वाक्षरी झालेल्या व्यापक आर्थिक भागीदारी करारांतर्गत, भारतातून यूएईमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या बहुतांश वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले किंवा कमी करण्याचे मान्य करण्यात आले आहे. या अनुषंगाने, द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया आणि शारजाह सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या पाठिंब्याने अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) आणि स्त्री उद्यमी फाउंडेशनने नाशिकमध्ये भारतीय उद्योगांसाठी यूएईमधील विविध व्यवसायसंधी आणि सेफ झोनमध्ये व्यवसाय सुरू करण्याच्या फायद्यांविषयी जागरूकता करण्यासाठी परिषदेचे आयोजन केले होते.

सेफ झोनमधील जवळपास ६० टक्के गुंतवणूकदार भारतातील असून, महिला उद्योजकांना आपला व्यवसाय इथे सुरू करण्यासाठी यूएई सरकारतर्फे खास प्रोत्साहन पॅकेज देण्यात येते.परिषदेस यावेळी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, एमएसएमईचे अध्यक्ष आशिष नहार, स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा स्वाती शहा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले बी २ बी मध्ये नाशिकमधील सुमारे १२५ उद्योजकांनी चर्चा केली असून, यापैकी अनेक जणांनी सेफ झोनमध्ये व्यवसाय सुरू करण्यास अनुकूलता दाखवली आहे.

याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, एमएसएमई (पीआर) समितीचे चेअरपर्सन आशिष नहार, असोचेमचे उपसंचालक इरफान आलम, यूएई शारजाह, सेफ झोनचे पी. राजीव, अनुप वॉरियर, स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा स्वाती शहा उपस्थित होते. सेफ झाेनमधून नाशिकमधील व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठेशी जाेडण्याची कशी संधी उपलब्ध आहे, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या झाेनमधील सुविधांची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...