आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुजी गेले:अज्ञात वाहन दुचाकीला धडकून मुख्याध्यापकाचा मृत्यू; नाशिक कळवण रस्त्यावरील घटना

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने कळवण येथील माध्यमिक विभागात कार्यरत मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (ता. 8) रात्री नांदुरी गावाजवळ घडला. संजय पांडूरंग गायकवाड (वय 46) असे मृत मुख्यध्यापकाचे नाव आहे. ते आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित,पोस्ट बेसिक प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा, पिंपळे (ता. कळवण) येथे मुख्याध्यापक होते.

मुख्याध्यापक गायकवाड हे त्यांच्या दुचाकीने शाळेतून पिंपळेकडून नाशिककडे येत होते. अहिवंतवाडीजवळ मागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. यात ते गंभीर जखमी झाले. परिसरातील रहिवाशी, वाहनचालकाने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरंनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच आश्रम शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गायकवाड यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मुखाध्यापक गायकवाड हे अतिशय मनमिळावू व विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना ही त्यांनी शालेय जीवनापासून संघर्षाने पार्टटाइम काम करून शिक्षण पूर्ण केले होते. उच्च शिक्षण घेत त्यांनी नौकरी मिळवली होती. शिक्षक म्हणून उत्कृष्ठ काम केले. त्यामुळे संस्थेने त्यांची मुख्यध्यापकपदी नियक्ती केली होती. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...