आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘ती’ सकाळी झाेपेतून जागी झाली की हांडा, कळशी घेऊन सरळ पाण्याच्या शाेधात निघायची... सात-आठ किलाेमीटरची पायपीट केल्यावर कुठेतरी दाेन हांडे पाणी तीला मिळत असे. एवड्याशा पाण्यातच दिवस घालवायचा. पण आता मात्र तीची तहान पूर्ण भागली आहे. नदीकिनारीच विहीर खाेदली असून आता त्याला खूप खाेल पाणी लागले. सामाजिक संस्थांच्या मदतीने ते पाणी वर आणले आणि तीच्या डाेक्यावरचा हांडा खाली उतरला.
सात-आठ किमीची पायपीट
पेठ तालुक्यातील डोंगरशेत, मोहाचा पाडा, चिरे-पाडा येथील आयाबायांना जेव्हा पाणी घरात आला तेव्हा तो क्षण दिवाळीचा होता. या तीनही गावांतील महिलांना पाणी आणण्यासाठी सात-आठ किलोमीटरची पायपीट करावी लागत असे. घरातील पाणी संपले की, पुन्हा तीच पायपीट. पाणी आणण्यातच या महिलांचा अर्धा दिवस जायचा. मग शेतीकामे होणार कशी, मुलही पाण्यासाठी वणवण फिरायची. मग त्यांची शाळेचा देखील प्रश्नच असायचा. यामुळे शिक्षणाचे नुकसान आणि घरातील महिलांच्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ अशा दुष्टचक्रात ही तीनही गावे अडकली होती.
अन् पाणी आले
या तीनही गावकऱ्यांची एकी आणि श्रमदानातून दमणगंगा नदी तीरावर एक विहीर खोदण्यात आली. तीला खूप खोलवर पाणी लागले. मग विहिरीतील पाणी पाइपलाइन टाकून विजेवर चालणाऱ्या मोटारीद्वारे ते पाणी वर खेचत या पाड्यातील टाक्यांमध्ये सोडण्यात आले. टाक्यांना दुसऱ्या पाइपलाइनची जाडणीकरत पाणी थेट नळांद्वारे ग्रामस्थांना मिळू लागले. या मुळे येथील 1500- 1700 ग्रामस्थांना पिण्याची पाण्याची व्यवस्था झाली आहे. आता महिलांच्या वेळेची बचत होत असल्याने त्या आता आपला वेळ घरकामात आणि शेती कामात देऊ लागले आहेत.
आव्हानात्मक प्रकल्प
हा प्रकल्प आव्हानात्मक होता कारण, याची उंची सुमारे 730 फूट होती. हा प्रकल्प सर्वात कठीण भूभागांपैकी एकामध्ये राबविण्यात आला आहे. ज्याची उंची 250 मीटर होती हे एक कठीण काम आहे जे गावकऱ्यांनी फत्ते केले. त्यासाठी आर्थिक हातभार एसएनएफ, ऑटोकॉम्प इंडिया आणि राेटरी क्लबने लावला. याकामात डॉ. श्रीया कुलकणी, मंगेश अपशंकर, विनायक देवधर, कमलाकर टाक आणि सुजाता राजेबहादूर, अॅड. मनीष चिंधडे उदयराज पटवर्धन यांनी विशेष पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.