आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हांडा आंदोलन:पिंपळगाव बहुल्यात पाण्यासाठी आंदाेलन

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावापासून हाकेच्या अंतरावर गंगापूर धरण असून महापालिका हद्दीतील सातपूरजवळीत घराघरांतील नागरिक तहानलेला असल्याने अखेरीस संतप्त महिलांनी गावात हांडा आंदालेन केले. पाणी न मिळाल्यास साेमवारी महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर हंडा माेर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. पिंपळगांव बुहला ग्रामस्थांना पाण्याची समस्या नित्याचीच झाल्याने संतप्त महिला रस्त्यावर उतरल्या.

रविवारी गावात कुठे पाणी आले, कुठे कमी दाबाने आले तर काही भागात आलेच नाही. हा खेळ आता नित्याचाच झाल्याने महिलांनी डोक्यावर हंडा-कळशी विशेष म्हणजे नगरसेवक याच गावातील असतानाही समस्या सुटत नसल्याचा आराेप या महिलांनी केला आहे. आंदाेलनात लंकाबाई धात्रक, लंकाबाई घुले, हसीना सय्याद, सिंधुबाईं थेटे, पिंटू घुले, संकेत नागरे, संतोष भालेराव, ताराबाई नागरे, विशाल भावले आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...