आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजग अंतराळ प्रवासाची स्वप्ने बघत असताना आजही अंधश्रद्धेचा पगडा समाजातील अनेकांच्या मनावर कायम आहे. तो पगडा कमी व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) सातत्याने कार्यरत आहे. नाशिक शहरात 'अंनिस'ने असेच एक मोठे काम केले आहे. अंधश्रद्धेपायी बेडीने बांधलेल्या एका मानिसक रुग्णांची 'अंनिस'ने मदत केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाला अघोरी पूजा करण्यासाठी नेण्यात येत होते. त्याचे हातपाय बांधलेले होते. रुग्णासह मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास नातेवाईक व भगत मोरवीस येथे आले. गाेदावरी नदीकाठी रहदारीपासून दूर अंतरावर एकांतात जमा झाले. हे संशयास्पद वाटल्याने गावकरी जमा झाले. मोरवीस गावचे पोलिस पाटील सोमनाथ पारखे व गावकरी गोरख कोकाटे यांनी तत्काळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिक येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना फोन करुन घटनेची माहिती दिली. चांदगुडे यांनी हा जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा असल्याचे नातेवाईकांना सांगितले. पीडितास मानसिक आजार असल्याने त्यास अशा अघोरी पूजेपेक्षा डाॅक्टरांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी पीडितास बांधलेल्या दोरातून मुक्त केले. यानंतर पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. संबधित भगतावर कारवाई होण्याची मागणी केली.
नागरिकांच्या जागरकतेने हा प्रकार उघडकीस
गावकऱ्यांच्या जागरुकतेमुळे अघोरी प्रयत्न थांबला. शिरवडे वकद येथे एका मांत्रिकाकडे घेऊन जात असताना जागृत नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. पीडित तरुण हा मानसिक आजाराने त्रस्त आहे. नातेवाईकांनी त्याला अनेक देवस्थानी नेले. इतकेच नव्हे तर पायात लोखंडी बेडी घातली. परंतु त्याला फरक पडला नाही. म्हणूण त्यांनी शिरवाडे(वाकद) येथील एका भगताकडे नेणार होते. गोदावरी नदीत आंघोळ घालून अघोरी पूजा करण्यात येणार होती
अशा रुग्णांना उपचाराची गरज
मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाला साखळदंड, बेडी अथवा दोरात बांधून देवस्थानी ठेवत अघोरी कृत्य करणे योग्य नाही. त्यास मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घ्यावे, असे आवाहन मानसोपचार तज्ञ डॉ हेमंत सोननिस यांनी केले.
अशा घटनांची अंनिसला माहिती द्यावी
आजही समाजात अंधश्रध्दा आहे. बाहेरचे झाले आहे म्हणून त्यांच्यावर अघोरी उपचार केले जातात. यात रुग्णांना साखळदंड, बेडीला बांधले जाते. अशा घटना घडत असल्यास अंनिसला कळवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.