आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर निदर्शने:विविध प्रलंबित मागण्या संदर्भात सीटू आक्रमक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. यावेळी न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही पोषण ट्रॅक्टरची सुविधा मराठीत उपलब्ध न करून दिले नाही. तसेच आधार लिंकिंग नसलेल्या लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवू नये, यासह अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १) अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

पोषण आहार ट्रॅकर मराठीतून असावा यासाठी अंगणवाडी कृती समितीच्या वतीने उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संपूर्णपणे मराठीत ॲप उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनास दिले आहेत. मात्र अद्यापही मराठीतील पोषण ट्रॅकर अंगणवाडी सेविकांना मिळालेले नाही.

जोपर्यंत मराठीत पोषण ट्रॅकर मिळत नाही, तोपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी माहिती न पाठवल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये यासह अनेक आदेश न्यायालयाने देऊनही कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मानधनात याच कारणामुळे कपात करण्यात आलेली आहे. 2018 मध्ये दिलेला दिलेला कमी क्षमतेचा मोबाईल सतत ना दुरुस्त होतो त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप नेहमी अपडेट करावे लागते. शासनाने मोबाईल देण्याऐवजी स्वतःच्या खासगी मोबाईलवर कामकाज करण्याचा दबाव आणला जात आहे.

शासनाने दर्जेदार मोबाईल देऊन त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च उचलावा व रिचार्ज सारखे वाटत असून बाजारातील दराप्रमाणे रिचार्ज साठी आगाऊ रक्कम देण्यात यावी, ऑनलाइन काम प्रचंड वाढल्याने मानधनात वाढ करावी, सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2022 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबत दिलेल्या आदेशानुसार आयसीडीएस ही एक आस्थापना असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पद हे वैधानिक आहे. शासन जरी त्यांना या कामासाठी मानधन देत असले तरी प्रत्यक्षात ते वेतनच आहे. त्यामुळे त्यांना ग्रॅच्युइटी मिळण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यानुसार राज्य शासनाने ठोस पावले उचलावीत आदी मागण्यासाठी गोल्फ क्लब मैदान येथे अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले. महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले. आंदोलनात सिटू चे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबर, देविदास आडोळे, अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना ठोंबरे, कल्पना शिंदे, लता डावरे, आदींसह सेविका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...