आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाचा आग्रह वडिलांच्या अंगलट:'फादर्स डे'ला तलवारीने केक कापणे भोवले, वाढदिवसाचे सेलिब्रेशन पोलिस कोठडीत

नाशिक2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'फादर्स डे'च्या दिवशी मुलाच्या प्रेमापोटी तलवारीने केक कापून फोटो सोशलमीडियावर व्हायरल करणे एका वडिलांच्या चांगलेच अंगलट आले. पोलिसांनी या संशयित पिता-पुत्रांना शोधत ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून तलवारही जप्त करण्यात आली. गुरुवारी (ता. 23) गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने फुलेनगर येथे ही कारवाई केली.

व्हिडीओ व्हायरल

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोशल मीडियावर काही लोक फादर्स डेच्या दिवशी तलवारीने केक कापत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोच्या अधारे पथकाचे महेश साळुंके यांना संशयित हा फुलेनगर येथील असल्याची माहिती मिळाली. पथकाने फुलेनगर येथे जाऊन संशयित शांताराम गुरगुडे यास ताब्यात घेतले.

मित्रांचा हट्ट भोवला

घरझडतीमध्ये पलंगाच्या खाली तलवार आढळून आली. चौकशीत मुलाच्या आणि त्याच्या मित्रांच्या हट्टापायी तलवारीने केक कापल्याचीच कबूली दिली. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, विष्णू उगले, सुरेश माळोदे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, असिफ तांबोळी, नाझिम पठाण, प्रशांत मरकड, यांच्या पथकाने उपआयुक्त संजय बारकुंड,सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. संशयित गरगुडे यांस फादर डे साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या अतिउत्साहीपणामुळे सेलिब्रेशन आणि त्यामुळे पोलिस कोठडीची हवा त्यांना खावी लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...