आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोश्यारीजी जरा सांभाळून बोला..!:उकसवू नका, महाराष्ट्र सोशिक, अन्य राज्यात आदर्शांवर बोलले असते तर रान पेटलं असतं- छगन भुजबळ

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरुन पुन्हा राज्यपालांवर टीकेची झोड राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही राज्यपालांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यपालांचे दुसऱ्यांदा वक्तव्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंबधी दुसऱ्यांदा केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील नायक होते असे विधान केल्याने राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार सर्वच थरातून घेतला जात आहे.

छगन भुजबळांचा सवाल

छगन भुजबळ म्हणाले, राज्यपाल अशी वेगवेगळी वक्तव्ये का करत आहेत हे कळत नाही. शिवाजी महाराज जुने झाले असतील तर मोदींना त्यांची प्रतिमा होर्डिंगवर लावून ‘सबका साथ, सबका विकास, छत्रपतींचा आशीर्वाद’ असं का लिहावे लागते?

तुलना कुणाशीच करू नका

छगन भुजबळ म्हणाले, राज्यपाल हे महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी सांभाळून बोलावे. काहीही वक्तव्य करून लोकांना उकसवू नये. शिवरायांची तुलना कुणाशीही करु नये. जगभर महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. अफजलखानाला पत्रे पाठवणे ही शिवाजी महाराजांची रणनीती होती.

महाराष्ट्र सोशिक

भुजबळ म्हणाले, महाराष्ट्रात हे वक्तव्य केले पण महाराष्ट्र सोशिक आहे. अन्य राज्यात जर असे वक्तव्य केले असते तर अख्खे राज्य पेटून उठले असते. राज्यात राज्यपालांचा मान राखला जातो. मग राज्यापालांनीही तेवढ्याच जबाबदारीने वक्तव्य करायला हवी. त्यांनी सर्व गोष्टींचा सारासार विचार करायला हवा.

या वक्तव्यावरून वाद

औरंगाबादेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शनिवारी बोलताना राज्यपाल म्हणाले होते की, तुमचे आदर्श कोण आहेत असे जेव्हा पूर्वी विचारले जात तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरं दिली जात असत. परंतु महाराष्ट्रात मात्र तुम्हाला तुमचे आदर्श अन्यत्र शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शरद पवारस नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत.

बातम्या आणखी आहेत...