आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनवेगिरी उघड:दैवी शक्ती, पूजाविधी करत पुत्रप्राप्ती होईल असे सांगणाऱ्या भोंदूबाबाचा अंनिसने केला भंडाफोड; गंगापूर ठाण्यात गुन्हा

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फसवणूक झालेल्यांनी समाेर यावे

अशी कोणतीही समस्या नाही ज्याला उपाय नाही, अशी जाहीरात करत शहरात भोंदूगिरी करणाऱ्या एका महाराजाचा अंनिसने भांडाफोड केला. दैवी शक्ती तसेच पूजाविधी करत संतान प्राप्ती हाेईल, असे संागत ५० हजारांची मागणी करणारा भोंदुगिरी करणाऱ्या गणेश महाराजाचा कारभार मंगळवारी अंनिसचे बनावट ग्राहक पाठवत उजेडात अाणला. या प्रकरणी गंगापूर पाेलिसांनी त्या महाराजाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर रोड येथील संुमगल प्राईड इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं ६ मध्ये स्वत:ला ज्योतिषी सांगणाऱ्या गणेश महाराजाने काही दिवसांपासून बस्तान मांडले होते. असा कोणताही मनुष्य नाही ज्याला समस्या नाही, अशी कोणतीही समस्या नाही ज्याला उपाय नाही, अशी पत्रकाद्वारे तो जाहिरात करत होता. या प्रकाराची दखल घेत अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक म्हणून त्या महाराजाकडे एका महिलेला पाठवले हाेते. या महिलेने मूलबाळ हाेत नसल्याची समस्या त्या महाराजाकडे मांडली. मूलबाळ हाेण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल. यासाठी उद्या सकाळी लाल साडी घालून या, असे सांगत त्या महिलेकडे ५० हजारांची मागणी केली. हा सर्व प्रकार माेबाइलमध्ये रेकाॅर्ड करत त्या महिलेने अंनिसच्या पदाधिकाऱ्यांसह थेट गंगापूर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता गंगापूर पाेलिस पथकाने धाव घेत भाेंदुगिरी करणाऱ्या त्या महाराजाला ताब्यात घेतले. या प्रकरणी गंगापूर पाेलिस ठाण्यात जादुटाेणा कायद्यान्यवे गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती यावेळी अंनिसचे राज्य सचिव डाॅ. ठकसेन माेराणे यांनी दिली.

फसवणूक झालेल्यांनी समाेर यावे
दैवी शक्ती वा पूजाविधी असे संागत नागरिकांची अर्थिक फसवणूक करणाऱ्या, भाेंदू महाराज, बाबा विराेधात नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात. अशा भाेंदूंविराेधात अंनिसच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात येतील. -कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस

बातम्या आणखी आहेत...