आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक मनपाची कारवाई:अवैध वृक्षतोडीप्रकरणी खासदारपुत्र अंजिक्य गोडसेसह योगेश ताजनपुरेवर गुन्हा दाखल

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र.19 मधील देवळाली शिवारातील सर्वे न.193-20 ब,न्यू बालाती हॉटेल ढाब्या शेजारी असलेल्या खर्जुल मळा परिसरात वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेताच 9 जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सात वृक्षतोडीप्रकरणी अखेरीस पालिकेच्या उद्यान विभागाच्या पाठपुराव्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अंजिक्य गोडसे आणि योगेश ताजनपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरी क्षेत्रात कोणत्याही मिळकतीमधील झाडांचे संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्रा) झाडांचे जतन अधिनियम कायदा 1975 व सुधारणा अधिनियम 2021 पारीत केला आहे.त्यानुसार वृक्ष प्राधीकरण समितीच्या परवानगीविना वृक्ष तोड करता येत नाही. मात्र खर्जुल मळे परिसरात वृक्षतोड केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली. त्यानुषंगाने पालिकेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत वृक्षतोड थांबवून ट्रकसह साहित्य जप्त केले आहे.तसेच गोडसे आणि ताजनपुरे यांना अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी चार लाख 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.तसेच संबधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नाशिकरोड पोलिसांना पत्र दिले होते, मात्र कारवाई होत नव्हती. अखेरीस पालिकेचे उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर 11 जून रोजी गोडसे व ताजनपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...