आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधनसंपत्ती अनेक जण आयुष्यभर जमवत असतात पण खरी संपत्ती असते ती माणसांची. किती माणसे आपण आयुष्यात जाेडताे तीच खरी संपत्ती. अशी माणसांची अफाट संपत्ती जमा केलेले अण्णा म्हणजेच मधुकर झेंडे हे खऱ्या अर्थाने धनवान असल्याचे मत ज्येेष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.
नाशिकचा चालता-बाेलता इतिहास असलेल्या अण्णा झेंडे यांच्या गुण गाईन आवडी या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी प्रमुख अतिथी म्हणून गाडगीळ बाेलत हाेते. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माजी अध्यक्ष अण्णा झेंडे यांच्या पुस्तक प्रकाशनासह त्यांचा यथाेचित सत्कार प. सा. नाट्यगृहात पार पडला. यावेळी गाडगीळ म्हणाले की, काही माणसांच्या कर्तृत्त्वाचा परिघ माेठा असताे मात्र ती माणसे साधी असतात. नाशकातील सामान्य माणसापासून ते थेट मंगेशकर घराण्याशी अण्णांनी स्नेह जपला. कला व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांमध्ये त्यांची उठबस असते. असे असूनही त्यांनी कधी त्याचा उहापाेह केला नाही. अशी माणसे समाजात अत्यंंत थाेडी असल्याचेही गाडगीळ यांनी नाेंदविले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बाेलताना सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके म्हणाले की, १९७०च्या सुमारास सावानाच्या निवडणुकीत अण्णा आमच्या पॅनलचे नेते हाेते. गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांपासून त्यांचा सावानाशी संबंध आहे. त्यांनी सावानातील पदाधिकाऱ्यांच्या पिढ्यांबराेबर काम केले आहे. त्यामुळे अण्णा हे सावानाचे वास्तूपुरुषच असल्याचे फडके यांनी व्यक्त केले. तर सत्काराला उत्तर देताना अण्णा म्हणाले की, आज मी अत्यंत सुखी आहे. बाेलताना त्यांच्या डाेळ्यांत आनंदाश्रुु तरळले हाेते. पालिकेत काम करताना मर्यादा येत हाेत्या तरी भरपूर कामाची संधी मिळाली. अनेक मान्यवरांसह मंगेशकर कुटुंबियांशी लाेभ राहिला. मी निवेदनाची शैलीही सुधीर गाडगीळ यांचीच घेतल्याचेही अण्णांनी व्यक्त केले.
यावेळी सावानाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, प्रा. सुनील कुटे, धर्माजी बाेडके, गिरीश नातू, अॅड. अभिजित बगदे, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, प्रशांत जुन्नरे, सुभाष सबनिस आदी उपस्थित हाेते. प्रा. कुटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर देवदत्त जाेशी यांनी सूत्रसंचलन केले. गणेश बर्वे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.