आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Annasaheb More's Guidance To Devotees, Celebration Of Tulsi Marriage In Devotional Atmosphere, Country Will Survive Only If Culture Survives

संस्कृती टिकली तरच देश टिकेल:अण्णासाहेब मोरे यांचे सेवेकऱ्यांना मार्गदर्शन, भक्तीमय वातावरणात तुळशी विवाह साजरा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री क्षेत्र संत शक्ती धाम देवस्थान, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व श्री लोकनेता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम कथा व कार्तिक एकादशी निमित्त कृष्ण(दामोदर) व तुलसी विवाह सोहळा व सर्व जाती धर्मिय वधुवर परिचय मेळावाछत्रपती राजे संभाजी स्टेडियम या ठिकाणी संपन्न झाला.

यावेळी प्रमुख स्वामी समर्थ केंद्र त्रंबकेश्वरचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, रामायणाचार्य समाधानजी महाराज शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तुळश व तिचे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्व सेवक-यांना समजून देताना अण्णासाहेब मोरे यांनी धर्म, संस्कृती जपा म्हणजे चांगले संस्कार व आदर्श पिढी घडेल असे सांगितले. त्याच वेळी

आयोजक लोकनेता प्रतिष्ठाण अध्यक्ष गोविंद घुगे, माजी नगरसेविका कावेरी घुगे, आमदार सीमा हिरे, महेश हिरे, संजय धोंडगे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, शाम बडोदे, सुदाम कोंबडे, सुदाम ढेमसे, प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, अजय बागुल, मुकेश शहाणे, छाया देवांग, कल्पना चुंबळे, हर्षा फिरोदिया, कैलास चुंबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब साबळे, संजय देशमुख, ज्ञानेश्वर जटूरे, संजय सहाणे, पांडुरंग आरोटे, अनिल शेळके, ह भ प राहुल महाराज साळुंके, अशोक रोंदळ, हर्षल भदाण महाले, प्रशांत पालवे, मेघश्याम निकम, समीर सुर्वे यांनी प्रयत्न केले.

याप्रसंगी माऊली अण्णासाहेब मोरे यांनी उपस्थित भाविकांचे हितगुज करताना सांगितले की पाश्चात्य संस्कृतीचे वाढते अवलोकन हे अयोग्य असून आपली भारतीय संस्कृती टिकली तरच राष्ट्र टिकेल राष्ट्र टिकले तरच देश के टिकेल. अध्यात्मिक धार्मिक भावना जोपासताना त्याचे आदरणीय अंधानुकरण होणार नाही याची देखील काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांनी सात दिवस सुरू असलेल्या राम कथेचे निरूपण करताना सीता स्वयंमोरापासून तर शेतीचे रावणाच्या अशोका वाटिकेतून सुटका करून आल्यानंतरच्या प्रसंगाचे सादरीकरण केले.

बातम्या आणखी आहेत...