आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरणपोळीचे वाटप:अंनिसतर्फे गरिबांना पुरणपोळीचे वाटप

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरणपोळी किंवा अन्य अन्नपदार्थ होळीत किंवा अग्नीत टाकून जाळण्याऐवजी भुकेलेल्यांच्या पोटातील आग विझवणे हे महत्त्वाचे आहे, हा विवेकी विचार समाजात रुजवण्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक जिल्हा शाखेने, ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम राबविला.

त्याअंतर्गत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नाशिकरोड येथील आनंदभक्ती इमारत, दत्तमंदिर या भागातून पोळ्या मिळवल्या आणि त्या नाशिकरोड पुलाखालील व रेल्वे स्टेशनवरील गोरगरिबांना वाटल्या. जुनी पंडित कॉलनी, नाशिक येथून पोळ्यांचे संकलन करून त्यांचे जुना गंगापूरनाका परिसरातील गोरगरिबांना वाटप केले. कामगारनगर, सातपूर तसेच सुयोग कॉलनी, आनंदवली भागातून पुरणपोळ्या जमा करून त्यांचे परराज्यातील कामगार तसेच रस्त्याचे खोदकाम करून उघड्यावर राहणाऱ्या मजुरांच्या कुटुंबांमध्ये वाटप केले.

कार्यकर्त्यांनी गरीब-गरजूंना केवळ पोळ्यांचे वाटप न करता, त्यांच्यासोबत पोळ्यांचे सेवनही केले. त्यावेळी संबंधितांना खूप आनंद झाल्याचे दिसून आले. या उपक्रमात महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे, बुवाबाजीविरोधी संघर्ष जिल्हा सचिव महेंद्र दातरंगे, नाशिकरोड अंनिसच्या शाखेचे कार्याध्यक्ष अरुण घोडेराव आदींनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...