आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Announcement Of Janasthan Icon Awards On The Occasion Of Anniversary; Awards To Deepak Karanjikar, Vinayak Ranade, Prakashholkar |marathi News

पुरस्कार:वर्धापन दिनानिमित्त जनस्थान आयकॉन पुरस्कारांची घोषणा; दीपक करंजीकर, विनायक रानडे, प्रकाशहोळकर यांना पुरस्कार

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनस्थान’ ग्रुपच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त जनस्थान आयकॉन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा अभिनेते व लेखक दीपक करंजीकर, ग्रंथमित्र विनायक रानडे आणि कवी-गीतकार प्रकाश होळकर यांना देण्यात येणार आहे. यावेळी कवी अशोक बागवे उपस्थित राहणार आहेत. प. सा. नाट्यगृहात गुरुवारी (दि. २३) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन अभय ओझरकर, स्वानंद बेदरकर, विनोद राठोड यांनी केले आहे.

दीपक करंजीकर यांचे भारतात आणि भारताबाहेर हे मराठी नाटकावर विशेष काम आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा विविध भूमिका ते पार पाडतात. अर्थतज्ज्ञ म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. शासकीय-निमशासकीय अशा संस्थांवर महत्त्वाच्या पदांवर ते काम करतात. विनायक रानडे यांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी...’ या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचन आणि वाचक चळवळीला देश आणि देशाच्या बाहेर अनेक राष्ट्रांमध्ये पोहोचविले असून त्यांचे हे काम वाचनसंस्कृतीला बळ देणारे ठरले आहे. प्रकाश होळकर यांचा ‘कोरडे नक्षत्र’ या कविता संग्रहापासून सुरू झालेला प्रवास आजही सुरू आहे. चित्रपटगीते, अभ्यासक्रमात कविता याबरोबरच साहित्य-संस्कृती संस्थांमधील मानाची पदे ते आज भूषवित आहेत.

बातम्या आणखी आहेत...