आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ तट्टे, जयवंत बोधले, संदीप जगदाळे मानकरी:कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार व कवी भिमराव कोते काव्य पुरस्कारांची घोषणा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार देण्यात येतात, यावर्षीच्या साहित्य पुरस्काराची घोषणा नुकतेच कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आली आहे.

साहित्य प्रकारातील कथा, कादंबरी आणि कविता इत्यादी साहित्य प्रकारासाठी देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या पुरस्कारासाठी खालील साहित्यिकांची निवड घोषित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती वाचनालयाचे सचिव राजू नाईक, डॉ. मनीषा जगताप, रविकांत शार्दुल, राजू देसले, दत्तू तुपे, डॉ. विशाल जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

यांना जाहीर झाले पुरस्कार

एकनाथ तट्टे, परतवाडा जिल्हा अमरावती यांच्या "येन्जो " कादंबरीला. जयवंत बोधले, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव यांच्या "मांडूळ" कथासंग्रहाला.

विजय इंदूशोकाई दोंडाईचा, जिल्हा धुळे आहे यांच्या "बीईंग" या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रसिद्ध कवी भीमराव कोते यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या काव्य पुरस्कारासाठी संदीप जगदाळे रा. पैठण यांच्या "असो आता चाड" या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या प्रत्येक साहित्यकृतीस रुपये ५०००/- रोख, स्मृतीचिन्ह, बुके आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण समारंभ १३ नोव्हेंबरला - रविवार दि. १३ नोव्हेंबर २२ रोजी सायंकाळी ५ वाजता कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय राजे संभाजी स्टेडियम जवळ, सिंहस्थ नगर, सिडको नाशिक या ठिकाणी पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. दरवर्षी या पुरस्कारांचे घोषणा करून पुरस्कार वितरित केले जातात. साहित्य क्षेत्रात अतिशय मानाचे पुरस्कार मानले जातात या पुरस्कार त्यांच्या निवड समितीमध्ये राज्यभरातील मोठ्या साहित्यिकांचा समावेश असतो.

बातम्या आणखी आहेत...