आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराला रोज ५४० एमएलडी पाणी लागले. हे पाणी नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी त्यातही प्राधान्याने पिण्यासाठीचे असते. असे असतानाही शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांनाही हेच पिण्याचे शुद्ध पाणी वापरले जात असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत उघड झाले आहे.
बांधकामांसाठी टँकरद्वारे पाणी मागवावे किंवा बोअरद्वारे पाणी घ्यावे असे असतानाही पालिकेचे पाणी वापरले जाते. मुख्य म्हणजे यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणाच अस्तित्वात नाही. विशेष म्हणजे धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आलेले पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यास पालिकेला वर्षाकाठी सुमारे ८७ कोटी रुपये खर्च येतो. असे असतानाही याच पिण्याच्या पाण्याचा नव्या बांधकामांवर सकाळ-संध्याकाळ अभिषेक करण्यात येत आहे. ज्या बांधकामांच्या ठिकाणी बोअर नाही अशा व्यावसायिकाने बांधकामासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी खासगी टँकर आणणे बंधनकारक आहे.
दुसरीकडे मात्र जुन्या घराच्या विस्तारीकरणासाठी अथवा स्वतंत्र प्लॉट घेऊन बांधकाम करणाऱ्या नागरिकांकडून मात्र सर्रासपणे पिण्याच्या पाण्याचा वापर होतो. आमच्या प्रतिनिधीने प्रातिनिधिक स्वरूपात सिडको, पंचवटी, सातपूर या भागातील घरगुती बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चौकशी केली असता तेथे पिण्याच्या पाण्यासाठी घेतलेल्या नळ जोडणीतूनच बांधकामासाठी पाणी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी पाण्याचा खासगी टँकर आल्याचे आसपासच्या लोकांच्या कधीही दृष्टीस पडलेले नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.