आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Shinde Govt Cabinet Meeting | Another 3138 Hectares Area In Aurangabad, Nagar, Nashik Will Come Under Irrigation; Funds Were Also Increased

मंत्रिमंडळाची मंजुरी:औरंगाबाद, नगर, नाशिकमधील आणखी 3138 हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली; निधीही वाढवला

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस (सुप्रमा) राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. त्यामुळे पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे तसेच मांजरपाडासह पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण ही कामे २०२३ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी ३,१३८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून सकल राष्ट्रीय उत्पादनातही वाढ होईल. सध्या ७१०७२ हेक्टर सिंचनाखाली आहे. निधीमध्येही ५८०.८८ कोटींची वाढ करण्यात आली आहे.

७४,२१० हेक्टर सिंचनाखाली

२०२३ पर्यंत टप्प्या- टप्प्याने प्रकल्प होणार पूर्ण ७४२१० हेक्टर एकूण क्षेत्र येणार सिंचनाखाली. १४९८.६२ कोटींची एकूण तरतूद. तृतीय सुप्रमांतर्गत ९१७.७४ व चौथ्या सुप्रमांतर्गत ५८०.८८ कोटी ५०.७१३ दलघमी पाणी पिण्यासाठी उपलब्ध ७.४४ दलघमी पाणी लहानमोठ्या उद्योगधंद्यांसाठी.

या योजनांचा समावेश

मांजरपाडा (देवसाने) योजनेसह इतर सर्व प्रवाही वळण योजना, पुणेगाव- दरसवाडी, दरसवाडी- डोंगरगाव कालवा, ओझरखेड डाव्या कालव्याचा समावेश ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पामध्ये होतो.

प्रस्तावाचा प्रवास असा : प्रकल्प प्रस्ताव मार्च २०२१ मध्ये राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीकडून शासनास सादर. २४ फेब्रुवारी २०२२ च्या व्यय अग्रक्रम समितीत चर्चेनंतर विषय मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचा निर्णय. कॅबिनेटमध्ये विषय घेण्यासाठी मुख्य सचिवांकडून सूचना. जलसंपदा विभागाने ४ ऑगस्टच्या राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा क्लिअरन्स प्राप्त करत प्रस्ताव केला सादर. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.

बातम्या आणखी आहेत...