आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना लाभ:आयटीआय अनुत्तीर्णांना पुन्हा संधी, आजपासून ऑनलाइन परीक्षा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक शिक्षण व‎ प्रशिक्षण संस्थेत अर्थात आयटीआयमध्ये २०१४ ते २०२१‎ या कालावधीत प्रवेश‎ घेतलेल्या, परंतु उत्तीर्ण होऊ न‎ शकलेल्या प्रशिक्षणार्थींना दिल्ली येथील प्रशिक्षण‎ महासंचालनालयाच्यावतीने पुन्हा परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार (दि.१२) डिसेंबरपासून संगणक आधारित चाचणी (सीबीटी) परीक्षा घेतली जाणार आहे. नाशिकमध्ये ४०० हून अधिक विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. या परिक्षेसाठी राज्यातून साधारण १२ हजाराच्या वर आयटीआय अनुत्तीर्णांनी अर्ज दाखल केले आहेत.

महासंचालनालयामार्फत देण्यात‎ आलेल्या या संधीनुसार वार्षिक पुरवणी‎ परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली‎ जाणार आहे. यासाठी आवश्यक‎ प्रवेशपत्र संबंधित विद्यार्थ्यांना‎ उपलब्ध झाले आहे. दरम्यान‎ २०१७ ते २०२२ पर्यंत परीक्षा पद्धतीत‎ अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीला‎ लेखी, नंतर ओएमआर शीट आणि‎ नंतर ऑनलाइन असे बदल होत गेले.‎ यात काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते.‎ या विद्यार्थ्यांना ते नोकरी करत‎ असलेल्या ठिकाणी पदोन्नती, बढती,‎ वेतनवाढ यासाठी पदवी प्रमाणपत्राची‎ अनेकदा आवश्यकता भासत होती.‎ परंतु विशिष्ठ कालावधी उलटल्याने‎ अनेकांना यापासून वंचित राहावे‎ लागले होते. आता मात्र त्यांना पुन्हा परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने या संधीचा फायदा विद्यार्थ्यांना नोकरीच्या ठिकाणी होणार आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार या परीक्षा १२ ते १७ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. परीक्षेबाबत अधिक माहिती‎ http://ncvtmis.gov.in या‎ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ‎

शहरात ४०० हून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा सुरुवातीला ही परीक्षा २५‎ नोव्हेंबरपासून घेतली जाणार होती. परंतु त्याबाबत‎ कुठलेेही वेळापत्रक किंवा माहिती‎ स्थानिक आयटीआय संस्थांना प्राप्त झाली‎ नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत होते. मात्र याबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर झाले. त्यानुसार आता १२ डिसेंबरपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे. ‎नाशिक शहरात २०१४ ते २०२१ या कालावधीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४०० हून अधिक आहेत. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला प्रविष्ठ होण्याची संधी प्राप्त झाली आहे. ही वार्षिक पुरवणी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...