आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामीनारायण मंदिराकडून आयोजन:जागतिक पर्यावरण दिन व तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधत व्यसनविरोधी रॅली

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्यसनाच्या विळख्यात नागरीक,तरुणाई दिवसेंदिवस अडकत आहे. मात्र व्यसन म्हणजे विनाश असून यापासून सर्वांनी दूर राहिले पाहिजे असा संदेश देत बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या वतीने व्यसन विरोधी जनजागृती काढण्यात आली आहे.

जागतिक पर्यावरण दिन व तंबाखू विरोधी दिनाचे याचे औचित्य साधत बीएपीएस स्वामीनारायण मंदिर सत्संग मंडळ वतीने रविवारी व्यसन विरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 4.30 वाजता पंचवटी कारंजा येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या चिमुकल्यानी विविध वेशभूषा परिधान करत, तसेच हातात घोषवाक्यचे फलक हातात घेत व्यसनविरोधात जनजागृती करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

साधुगणसह,महिला, लहानमुले यात सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्याबाबत आवाहन करण्यात आलेपंचवटी कारंजा येथून प्रारंभ झालेली ही रॅली निमाणी बसस्थानक, जुना आडगाव मार्ग केवडीबन परिसरात असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे समारोप करण्यात आला. समाज प्रबोधन करण्याच्या हेतूने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले

नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत

समाज प्रबोधनाच्या दृष्टीने बीएपीएस स्वामीनारायण मंदिर सत्संग मंडळ च्या वतीने काढण्यात आलेल्या या वेळीचे ठिकाणी नागरिकांनी स्वागत केले तसेच याबाबतची माहिती जाणून घेतली

बातम्या आणखी आहेत...