आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात आणि प्रत्येक राज्यात हिदुत्ववादी सरकार सत्तेत आणण्यासाठी विश्व हिंदु परिषद ही साधु संताच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. जर भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रात आल्यापासून विहिंपची ताकद कमी झाली असा जो कोणी अपप्रचार करीत असतील ते हिंदु विरोधी षडयंत्र असल्याचा दावा विहिंपचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केला
तसेच कोणीही भाजपसोबत जोडून पाहू नये, विहिंप ही राजकीय पक्ष नसून हिंदुत्ववादी पक्षांना सत्तेत बसविणारी संघटना असल्याचेही परांडे यांनी सांगितले.
महामंत्री मिलिंद परांडे हे नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांच्यासोबत दिव्यमराठीच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता, त्यांनी विविध राष्ट्रीय मुद्द्यावर माहिती दिली. परांडे यांनी सांगितले की, भाजप सरकार हे स्थापन झाल्यापासुन विहिंपचे कोणतेही कार्य कमी झालेले नाही, उलट देशभरात हिंदु मुलींना लव्ह जिहाद पासुन वाचविणे, गोवंश वाचविणे, इसाई मुस्लिमांचा हिंदु धर्मात समावेश करणे यांची संख्या ही विहिंप ने वाढविली आहे. यंदाच्या हितचिंतक अभियानात 62 लाखाहून अधिक संख्या गेली असुन मागील वेळेस ती 31 लाख होती.त्यामुळे 100 टक्के काम वाढले असून 1 लाख गावापर्यंत विहिंपचे कार्य गेले आहे. विहिंप ही साधु संताच्या मार्गदर्शनाखाली हिंदु संस्कृती टिकविण्याचे काम करीत आहे. देशातील सहा राज्यात तीन वर्षामध्ये धर्मांतर विरोधी कायदे झाले असुन यामध्ये विहिंपची महत्वाची भुमिका आहे. कायदे हे सत्ताधारी तयार करीत असले तरी या धर्मांतर विरोधी मध्ये काम करणारे गट तयार करणे, त्याचा मसुदा तयार करणे, विविध राजकिय पक्षांसोबत चर्चा करणे हे काम समाजातुन होत आहे, त्यासाठी विहिंप प्रचार करीत आहे. विहिंप ही देशभरात 5 हजार 700 हुन अधिक सेवा कार्य चालवित असुन या ठिकाणी शिक्षण, आरोग्य,महिला सशक्तीकरण, कौशल विकासांच्या माध्यमातुन प्रबोधन करीत आहे. तसेच ब्राम्हणाव्यतिरिक्त हिंदु धर्मात पुजारी तयार झाले पाहिजे यासाठी तरुणांना पुजारी प्रशिक्षणाचे कार्य सुरु आहे. धर्माचे शिक्षण हे सर्वांसाठी असुन तामिळनाडुमध्ये 25 हजाराहून अधिकांना पुजाऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात आले, यामध्ये ब्राम्हण समाजाचे 20 टक्के होते, उर्वरित प्रशिणार्थी हे इतर समाजातील असल्याचे परांडे यांनी सांगितले.हिंदु धर्म हा सुलभ करुन सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे,यामुळे सामाजिक समरसतेचा भाव वाढतो,ही हिंदु धर्माची शिकवण आहे. मात्र काही हिंदू विरोधी शक्ती अनेक जातींना व सांप्रदायांना भकडविण्याचे काम करीत असल्याचा आरोप परांडे यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.