आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताह:विद्यार्थी ज्ञानवृद्धीसाठी प्रतिजैविक जागरूकता सप्ताह 18 पासून

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात १८ ते २४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यातून विद्यार्थ्यांना त्यांचे या विषयातील ज्ञान विस्तारण्याची संधी मिळेल. या सप्ताहात प्रतिजैविकांच्या आवश्यक वापराबाबत जनजागृती केली जाते. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठात या विषयावरील विविध स्पर्धा, प्रश्नमंजूषा आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याचे सूक्ष्मजीवशास्त्रच्या विभागप्रमुख डॉ. करिश्मा परदेशी व या कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. सुरेखा सातपुते यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...