आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाशिकच्या युवकाने तयार केले अॅप; वैद्यकीय मदत मिळणार

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेकदा अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळू न शकल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागतो. याच पार्श्वभूमीवर शहरातील मयूर जसनानी या युवकाने अंत्यत उपयुक्त असे साथी अॅप तयार केले असून अपघात घडल्यास या अॅपद्वारे संबंधित व्यक्तींच्या नातेवाइकांना तातडीने संपर्क साधण्यास मदत होणार आहे. यामुळे अपघातग्रस्तांना वेळीच वैद्यकीय मदत मिळणार आहे.

अपघातानंतर संबंधितांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र अनेकदा अपघातग्रस्तांना मदत मिळत नाही किंवा मदत मिळण्यास उशीर होता. यामुळे संबंधित अपघातग्रस्ताच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. ही बाब लक्षात घेत तत्रज्ञानाची सांगड घालत मयूर जसनानी याने साथी अॅपच्या माध्यमातून स्टार्टअप सुरू केले आहे. वाढते अपघात बघता ऐनवेळी कुणाशी संपर्क साधायचा असल्यास सरकारी यंत्रणा असो किंवा सामान्य नागरिक यांना धावपळ करावी लागते. अपघातग्रस्त व्यक्तीच्या नातेवाइकांची शोधाशोध करावी लागते. यासाठी बराच वेळ खर्ची पडतो. परिणामी उपचारास उशीर होतो आणि व्यक्ती जीवास मुकते. त्यासाठी हा क्यूआर कोड आणि साथी ॲप अतिशय महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

क्यूआर कोड दुचाकी किंवा चारचाकी वाहनावर लावून हे ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करावे. प नसेल तर तरी गुगल लेन्सने हा कोड स्कॅन करता येतो. यामध्ये आपल्या घरचा, जवळचे नातेवाईक, मित्र, शेजारी असे कोणतेही चार संपर्क क्रमांक सेव्ह करण्याची सोय आहे. वाहनाला अपघात झाल्यानंतर हा कोड स्कॅन केल्यावर यापैकी जो नंबर निवडला जाईल त्यावर ऑटो कॉल जाईल आणि अपघातग्रस्त व्यक्तीची माहिती त्याच्या नातेवाइकांपर्यंत वेळेत पोहोचू शकेल. परिणामी मित्र वा नातेवाईक घटनेची दखल घेऊन वेळेत हॉस्पिटल अथवा अपघातस्थळी पोहोचून आपल्या जवळच्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतील.

बातम्या आणखी आहेत...