आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेने आता घरपट्टी पाठोपाठ पाणीपट्टीमध्ये सवलत योजना सुरू केली असून येत्या सोमवार (दि. १३)पासून ऑनलाईन अॅपमधून पाणीपट्टीची संपूर्ण वर्षभराची रक्कम भरल्यास चार टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. त्यासाठी अॅपद्वारे पाणीमीटरचे रिडींग घेवून अॅपवर अपलोड करावे लागणार आहे. पालिका आयुक्त रमेश पवार यांच्या उपाययाेजनेतून गेल्या २ महिन्यातच घरपट्टीपोटी पालिकेला ५४ कोटींचा महसुल मिळाला. ही गतवर्षीच्या तुलनेत ३५ कोटींची वाढ आहे. त्यामुळे आता पाणीपट्टी ऑनलाइन भरल्यास ४ टक्के सवलत दिली जाणार आहे.
..अशी मिळेल सवलत आॅनलाइन पाणीपट्टी भरणाऱ्यांना सद्यस्थितीत एक टक्का सवलत आहे. पाणीपट्टीचे देयक निर्धारित मुदतीत भरल्यास आणखी तीन टक्के याप्रमाणे चार टक्के सवलत दिली जाईल. ही योजना जुलै २०२२ पासून उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या अॅपसाठी करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे.
प्ले स्टोअरवर अॅप गुगल प्ले स्टोअरवर पालिकेचे अॅप आहे. मोबाइल फोनद्वारेच देयक उपलब्ध होणार आहे. पाणीपट्टीकरिता करवसुली विभागासाठी अॅप उपलब्ध दिली आहे. कर्मचाऱ्यांनी मीटर रिडिंगचा फोटो अॅपवर अपलोड केल्यानंतर नळ कनेक्शनधारकास इ-बिल तत्काळ पाठविले जाईल.
मीटर नादुरुस्त असल्यास दुप्पट दंड मीटर नादुरुस्त असल्याचे आढळल्यास अथवा मीटरच नसल्यास पाणीपट्टीपोटी संबंधित नळ कनेक्शनधारकाकडून सरासरी बिलाच्या दुप्पट दंड आकारला जाईल. त्यामुळे येत्या १५ दिवसांत मीटरची दुरुस्ती करून घ्यावी. तसेच ज्यांनी अद्याप मीटर बसविलेले नाहीत त्यांनी मीटर बसवून घ्यावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.