आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती:दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी अर्जाची मुदत 30 नोव्हेंबर

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षेत्तर (पोस्ट मॅट्रीक) व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येतात. या शिष्यवृत्तीच्या लाभासाठी शाळा व महाविद्यालयीन पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे.

पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी शालांतपूर्व शिष्यवृत्तीसाठी १५ नोव्हेंबर २०२२ तसेच शालांत परीक्षेत्तर (पोस्ट मॅट्रिक) व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबर, २०२२ पर्यंत https://scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

बातम्या आणखी आहेत...