आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ:योगशास्त्र अभ्यासक्रमासाठी 14 जानेवारीपर्यंत अर्ज मुदत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने योगविषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू झाला आहे. त्यासाठी अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली असून इच्छुकांना १४ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष शिक्षण प्राप्त कुठलाही विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे.

यासाठी वयाची अट असून, १८ वर्षे पूर्ण असावीत. तर ६० वर्षांपर्यंत कोणीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. यासाठी ५० जागा असून प्रथम प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीस प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. परदेशी विद्यार्थीही यासाठी अर्ज करू शकतात. अधिक माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...